अरूण गवळीला संचित रजा मंजूर

कुख्यात डॉन अरूण गवळीला संचित रजा मान्य करण्यात आलीय. स्थानिक प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर गवळीला फर्लो नाकारल्यावर गवळीतर्फे मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. 

Updated: Apr 26, 2017, 07:48 PM IST
अरूण गवळीला संचित रजा मंजूर title=

मुंबई : कुख्यात डॉन अरूण गवळीला संचित रजा मान्य करण्यात आलीय. स्थानिक प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर गवळीला फर्लो नाकारल्यावर गवळीतर्फे मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. 

अरूण गवळीचा संचित रजेचा अर्ज मान्य करत त्याला ४ आठवड्यांची संचित रजा देण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिलेत. तसंच २ आठवड्यांच्या आत गवळीला सोडण्याचे आदेश खंडपीठाने दिलेत. 

राज्य सरकारने नुकतेच संचित रजेसंबंधीचे नियम बदलले. आपल्या याचिकेच्या माध्यमाने या सुधारित नियमांना आव्हान अरुण गवळीने दिले. याचिकेवर सुनावणी करतांना उच्च न्यायालयाने आज हा निर्णय दिला.