मुंबई : अवघ्या १ तास ३२ मिनिटांत गुजरातहून निघालेले मुंबईला पोहोचले, यामुळे एका ५८ वर्षीय पुरुषास जीवनदान मिळाले. मुंबईतील ही पाचवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. राज्यात पहिल्यांदाच राज्याबाहेरून हृदय आणण्यात आलं.
हृदयाचा प्रवास
सुरतच्या महावीर रुग्णालयातून रात्री १० वाजून ३६ मिनिटांनी प्रवास सुरू झाला. वेगवान प्रवासात २६९ किलोमीटरचे अंतर १ तास ३२ मिनिटांत कापले. पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली
ग्रीन कॉरिडोर
एअरपोर्ट आणि ट्रॅफिक अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन चार्टड फ्लाइटसाठी सुरत ते मुंबई अवकाश मार्गावर ग्रीन कॉरिडोर केला होता.
मुंबईत एअरपोर्टच्या गेट क्रमांक ८ पासून ते फोर्टिस रुग्णालय या मार्गावर ग्रीन कोरिडोर करण्यात आला होता.
सांताक्रूझ विमानतळ गेट क्रमांक ८ - मिलिटरी रोड - सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड - छेडा नगर ते ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे - ऐरोली जंक्शन - फोर्टिस रुग्णालय, मुलुंड
४७ वर्षांनंतर पहिल्यांदाच
मुंबईत ४७ वर्षांनंतर पहिल्यांदाच झालेली, पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आमच्या रुग्णालयात झाली होती. त्याचप्रमाणे दुसऱ्या राज्यातून अवयव आणून झालेली पहिली प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही आमच्या रुग्णालयात झाली याचा आनंद आहे. भविष्यातही अवयवदानाचा, हृदयदानाचा टक्का वाढल्यास अनेकांना जीवनदान मिळू शकते, असे फोर्टिस रुग्णालयाच्या संचालिका डॉ. एस. नारायणी यांनी सांगितले.