डेबिट, क्रेडिट कार्डचा गैरवापर कऱणाऱ्या दहा जणांना अटक

तुम्ही जर हॉटेलमध्ये बिल भरताना कार्ड पेमेंट करत असाल तर सावधानता बाळगा. स्किमर यंत्रणेद्वारे तुमच्या कार्डचा डेटा चोरुन तुमच्या अकाऊंटमधून पैसे लंपास केले जाऊ शकतात. अशाच प्रकारे एका टोळीला ठाण्यात अटक करण्यात आलीय. या टोळीत सात वेटर्सचा समावेश आहे. 

Updated: Dec 20, 2015, 04:33 PM IST
डेबिट, क्रेडिट कार्डचा गैरवापर कऱणाऱ्या दहा जणांना अटक title=

मुंबई : तुम्ही जर हॉटेलमध्ये बिल भरताना कार्ड पेमेंट करत असाल तर सावधानता बाळगा. स्किमर यंत्रणेद्वारे तुमच्या कार्डचा डेटा चोरुन तुमच्या अकाऊंटमधून पैसे लंपास केले जाऊ शकतात. अशाच प्रकारे एका टोळीला ठाण्यात अटक करण्यात आलीय. या टोळीत सात वेटर्सचा समावेश आहे. 

हॉटेलात जेवणानंतर बिल भरताना ग्राहकांनी क्रेडिट अथवा डेबिट कार्ड स्वाईप करण्यासाठी दिल्यानंतर स्किमर यंत्रणेच्या सहाय्याने कार्डचा डेटा चोरायचा. त्याद्वारे बनावट कार्ड तयार करायचे आणि संबंधित कार्डमालकाच्या अकाउंटमधून पैसे हडप करण्याचे काम हे वेटर्स करत. 

या प्रकरणी कांदिवली येथे ठाणे पोलिसांनी सापळा रचला होता. या सापळ्यात सुमीत झिंगरन, विक्री काव्ह्रलो आणि केव्हीन डिसूझा यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३० बनावट क्रेडिट, डेबिट कार्ड ताब्यात घेण्यात आली. यांनी आतापर्यंत ३०० लोकांच्या अकाउंटमधून ३० लाख रुपये काढल्याचे चौकशीदरम्यान उघड झाले.