हार्बरची वाहतूक पूर्ववत, गाड्या उशिराने

वडाळा ते जीटीबी दरम्यान हार्बर मार्गावर लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने हार्बरची वाहतूक विस्कळीत झाली होती. ही वाहतूक पूर्ववत करण्यात आली तरी गाड्या उशिराने धावत असल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 5, 2013, 08:01 PM IST

www.24taas.com , मुंबई
वडाळा ते जीटीबी दरम्यान हार्बर मार्गावर लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने हार्बरची वाहतूक विस्कळीत झाली होती. ही वाहतूक पूर्ववत करण्यात आली तरी गाड्या उशिराने धावत असल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत.
वडाळा ते जीटीबी दरम्यान हार्बर मार्गावर लोकलचा डबा रुळावरून आज सायंकाळी चार घसरला. हा डबा घसरण्यासाठी कपड्याचा ढीग कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. रूळाच्या शेजारी कपड्याचा ढीग पडलेला होता. यातील कपडा रेल्वेच्या चाकात अडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे रूळावरून डबा घसल्याचे बोलले जात आहे.

वाशी-सीएसटी लोकलचा डबा घसरल्याने हार्बर मार्गावरून सीएसटीकडं जाणारी रेल्वे वाहतूक सुमारे दोन ते तीन तास विस्कळीत झाली होती. ही वाहतूक सुरळीत झाली तरी गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे गाड्यांना गर्दी होत आहे. घरी परणाऱ्या प्रवाशांना आज मोठ्या प्रमाणात समस्याचा सामना करावा लागत आहे.