'माझ्या आईला फासावर लटकवा' - मिखाईल बोरा

मुंबई : इंद्राणी मुखर्जीचा मुलगा मिखाईल बोरा याने आपली आई आणि शीना बोरा हत्येच्या कटात सामील असलेल्या इतर आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. 

Updated: Feb 18, 2016, 01:03 PM IST
'माझ्या आईला फासावर लटकवा' - मिखाईल बोरा title=

मुंबई : इंद्राणी मुखर्जीचा मुलगा मिखाईल बोरा याने आपली आई आणि शीना बोरा हत्येच्या कटात सामील असलेल्या इतर आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. 

टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रातील एका बातमीनुसार इंद्राणीच्या पहिल्या पतीपासून तिला झालेला मुलगा मिखाईल याने म्हटले आहे की, 'मी सुरुवातीपासून सांगतोय की या सर्व प्रकरणात पीटरही सामिल आहे. इंद्राणीसोबत तो इतके दिवस राहतोय आणि त्याला काही माहित नाही हे कसे शक्य आहे?'

त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्यालाही जीवे मारण्याचा कट रचला गेला होता. 'माझ्यामते इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी, संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्यामवर राय यांना फासावर लटकवलं गेलं पाहिजे. त्यांना जगण्याचा कोणताही अधिकार नाही,' असे त्याने सांगितले. 

मंगळवारी सीबीआयने ५२ साक्षीदारांचा जवाब नोंदवलेली ५०० पानांची चार्जशीट पीटर मुखर्जीविरुद्ध अपर मुख्य महानगर दंडाधिकारी ए.व्ही.अडोन यांच्याकडे दाखल केली. 'शीना आणि राहुल यांना एकमेकांपासून वेगळे करण्याचे प्रयत्न २००९ सालापासूनच सुरू होते. पण, ते दोघे वेगळे होत नाहीत हे कळल्यावर इंद्राणी आणि पीटरने शीनाला मारण्याचा कट केला,' असं चार्जशीटमध्ये नमूद केल्याचे एका सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले.