भ्रष्ट दोषी अधिकाऱ्याला सेवामुक्त करा - मुख्यमंत्री फडणवीस

भ्रष्टाचारात दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांना तातडीने सेवामुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले.

Updated: Feb 3, 2015, 08:17 PM IST
भ्रष्ट दोषी अधिकाऱ्याला सेवामुक्त करा - मुख्यमंत्री फडणवीस title=

मुंबई : भ्रष्टाचारात दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांना तातडीने सेवामुक्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले.

भ्रष्ट सरकारी अधिका-यांच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचा बडगा उगारलाय. वर्ग १, वर्ग २ आणि वर्ग ३ मधील २८ भ्रष्ट सरकारी अधिका-यांना तातडीनं सेवामुक्त करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. जर भ्रष्ट कर्मचा-यांना सेवामुक्त केलं नाही तर विभागप्रमुखांवर कारवाईचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात पुरवठा विभागातल्या एका तहसिलदाराला २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. अभय म्हसके असं या तहसिलदाराचं नाव आहे. एका रेशन दुकानदाराला मंजूर असलेला रॉकेलचा कोटा सुरळीत ठेवण्यासाठी, अभय म्हसकेनं ही लाच मागितली होती. 

विशेष म्हणजे सापळा रचून जिल्हाधिकारी कार्यालयातच, त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर अभय म्हसके याच्या बीड आणि औरंगाबादमधल्या घरांवर एसीबीकडून छापा टाकण्याता आलाय तर चौकशी सुरु आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.