मुंबई : जाहीरनामा प्रसिध्द होण्याआधीच मुंबईकरांसाठी शिवसेनेकडून घोषणांची खैरात करण्यात आली आहे. मालमत्ता करांत सवलत जाहीर करण्यात आली असून आरोग्यसेवा मोफत देण्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यांनी आज पत्रकार परिषद ही माहिती दिली.
आपले मुंबईकरांसोबत फक्त मतांच नातं नाही, असे ते म्हणालेत. येत्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने मोठी घोषणा केली आहे. शिवसेना पुन्हा सत्तेत आली तर मध्यमवर्गीय मुंबईकरांना मालमत्ता कर माफ करण्यात येणार आहे. याचा लाभ ५०० चौरस फूट घरांसाठी होणार आहे.
उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचा वचनमाना जाहीर करण्याआधीच महत्वाची घोषणा करून टाकली आहे. शासनांच्या आरोग्य सुविधांपासून वंचित राहिलेल्यांना 'बाळासाहेब ठाकरे सुरक्षा कवच' देण्यात येणार आहे.
दरम्यान, युतीबाबत त्यांनी भाष्य टाळले. युतीबाबत माझ्यापर्यंत अजुन निर्णय आलेला नाही. माझ्यापर्यंत आल्यानंतर बोलेन, अनिल परब सध्या युतीबाबत पाहात आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणालेत.