वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ऑईल टँकरला अपघात

मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एक ऑईल टँकर पलटी झाल्याने हजारो लिटर ऑईल रस्त्यावर पसरलं. 

Updated: Jan 19, 2017, 11:25 AM IST
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ऑईल टँकरला अपघात title=

मुंबई : मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एक ऑईल टँकर पलटी झाल्याने हजारो लिटर ऑईल रस्त्यावर पसरलं. 

बुधवारी मध्यरात्रीदरम्यान जोगेश्वरी हायवेवर वेगात असलेल्या ऑईल टँकरवरील नियंत्रण सुटलं आणि टँकर पलटला.. या अपघातात टँकर ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला, मात्र हजारो लीटर ऑईल रस्त्यावर सांडून वाया गेलं.

अपघातग्रस्त टँकरला सरळ करण्याचं काम रात्रभर सुरु असल्याने या रस्त्यावर पहाटे तीन वाजेपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती..