'खड्ड्याचा त्रास होत असेल तर न्यायाधिशांना गाड्या पुरवा'

मुंबईतल्या खड्ड्यांबाबतच्या जनहित याचिकेवरील सुनावणीत मुंबई महापालिकेनं अजब युक्तीवाद केला आहे.

Updated: Oct 21, 2016, 05:19 PM IST
'खड्ड्याचा त्रास होत असेल तर न्यायाधिशांना गाड्या पुरवा' title=

मुंबई : मुंबईतल्या खड्ड्यांबाबतच्या जनहित याचिकेवरील सुनावणीत मुंबई महापालिकेनं अजब युक्तीवाद केला आहे. न्यायाधिशांना खड्ड्यांचा त्रास होत असेल तर सरकारनं त्यांना अलिशान गाड्या पुरवाव्यात असा अजब आणि संतापजनक युक्तीवाद महापालिकेच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात केलाय.

तसंच मुंबईतल्या खड्ड्यांबाबत अभियंते दोषी नसल्याचा दावाही महापालिकेनं हायकोर्टात केला आहे. त्यामुळे महापालिकाच अभियंत्यांना पाठीशी घालत असल्याचं समोर आलं आहे. राजकीय पक्षांनी आणि माध्यमांनी पालिका अधिका-यांचा पाणउतारा करण थांबवावं असंही बीएमसीतर्फे जेष्ठ वकील अनिल साखरे यांनी युक्तिवाद केला आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी पाठवलेल्या पत्राची दखल घेत हायकोर्टानं यासंदर्भात सु-मोटो जनहित याचिका दाखल करून घेतली होती.