मुंबई : मुंबईतील विविध 15 रेल्वे स्टेशन्सवर 15 ऑगस्टपासून मोफत वायफाय सेवा सुरु करण्यात येणार आहे. रेल्वे प्रवाशांना स्थानकांवर जलद आणि मोफत इंटरनेट सेवा मोबाइलवर उपलब्ध व्हावी यासाठी ही वायफायची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
यामध्ये पश्चिम रेल्वेच्या 6 आणि मध्य रेल्वेच्या 9 रेल्वे स्टेशन्सचा समावेश आहे. 2018 पर्यंत देशभरातील एकूण चारशे स्थानकांवर वायफाय सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. यातील सुरुवातीला 100 स्थानकांवर टप्प्याटप्प्याने वायफाय सेवा 2016 पर्यंत देण्यात येणार आहे. रेल्वे टेल आणि गुगलमार्फत ही वायफाय सुविधा पुरवण्यात येते.
मध्य रेल्वे : घाटकोपर, मुलुंड, डोंबिवली, बदलापूर, कुर्ला, वाशी, वडाळा रोड
हार्बर रेल्वे : बेलापूर, चेंबूर
पश्चिम रेल्वे : दादार, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, विरार