हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे `ट्रामा सेंटर` सुरु

बईच्या पश्चिम उपनगरात पालिकेच्या पहिल्या ट्रॉमा सेंटरचं आज उद्घाटन झालं. जोगेश्वरीमधलं हे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय सायन रुग्णालयाच्या अंतर्गत काम करणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 21, 2013, 06:03 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईच्या पश्चिम उपनगरात पालिकेच्या पहिल्या ट्रॉमा सेंटरचं आज उद्घाटन झालं. जोगेश्वरीमधलं हे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय सायन रुग्णालयाच्या अंतर्गत काम करणार आहे.
आज झालेल्या उद्घाटन सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप नेते गोपीनाथ मुंडे, रिपाईं नेते रामदास आठवले तसंच महापालिका आयुक्त सीताराम कुंटे आदी उपस्थित होते. ३०४ बेडची क्षमता असलेल्या या रुग्णालयात ट्रॉमा विभाग-१५, अपघात विभाग-१०, न्युरो सर्जरी-१०, डायालिसिस केंद्र-१५ सशुल्क रुग्णशय्या २५, सिटीस्कॅन-एक्स रे अशा सुपरस्पेशालिस्ट सुविधाही उपलब्ध आहेत.

हे रुग्णालय लोकमान्य टिळक रुग्णालयाशी जोडले जाणार आहे. त्यामुळे हे ट्रामा सेंटर सुरू झाल्यामुळे सायन रुग्णालयाचा भार थोडा हलका होणार आहे. अपघातग्रस्तांना या ट्रामा सेंटरमध्ये तातडीनं आता उपचार मिळू शकतील. टिळक रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टघर ट्रॉमा केअर रुग्णालयातील रुग्णांवर उपचार करणार आहेत. या रुग्णालयासाठी जवळजवळ १२५ कोटींचा खर्च करण्यात आलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.