देशातल्या पहिल्या एअर अँब्युलन्स सेवेसाठी मेक इन इंडियामध्ये करार

मुंबईतील वैद्यकीय सेवेला देशातील विविध भागातून आणि जगभरातून मागणी आहे. हीच बाब लक्षात घेऊन मेक इन इंडियामध्ये बुधवारी महत्त्वपूर्ण करार करण्यात आला. 

Updated: Feb 18, 2016, 07:46 AM IST
 देशातल्या पहिल्या एअर अँब्युलन्स सेवेसाठी मेक इन इंडियामध्ये करार title=

मुंबई : मुंबईतील वैद्यकीय सेवेला देशातील विविध भागातून आणि जगभरातून मागणी आहे. हीच बाब लक्षात घेऊन मेक इन इंडियामध्ये बुधवारी महत्त्वपूर्ण करार करण्यात आला. 

मॅब एव्हिएशनने देशातील पहिली एअर अँम्बुलन्स सेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकारबरोबर सामंजस्य करार केला. मेक इऩ इंडिया सप्ताहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. 

रुग्णांची तसेच प्रत्यारोपणासाठी मानवी अवयवांची तातडीने वाहतूक करण्यासाठी ही एअर अँम्बुलन्स सेवा उपयोगात येणार आहे.