मालक लई कष्ट करू, पण आत्महत्या करायची नाय!

शेतकरी आत्महत्या काही लोकांना वरवरचा विषय वाटत असला, तरी आपल्या धन्याच्या जीवावर उठलेला प्रश्न सर्जा-राजालाही धास्तावतोय, एक मुका प्राणी तो आपल्या धन्याची समज काढतोय.

Updated: Jan 11, 2015, 11:28 AM IST
मालक लई कष्ट करू, पण आत्महत्या करायची नाय! title=

मुंबई : शेतकरी आत्महत्या काही लोकांना वरवरचा विषय वाटत असला, तरी आपल्या धन्याच्या जीवावर उठलेला प्रश्न सर्जा-राजालाही धास्तावतोय, एक मुका प्राणी तो आपल्या धन्याची समज काढतोय.

शेतकऱ्याचं जेवढं प्रेम पोराबाळांवर तेवढंच गाई-म्हशी आणि बैलांवरही असतं, कारण तो एकदा पोटाला खातांना आपलाही विचार करतो हे त्याला माहिती आहे. अशा धन्याची मुक्या प्राण्यांनाही चिंता आहे, हे व्हॉटस अॅपवर फिरणाऱ्या मेसेजमधील भावनांनी कळतंय. शेतकऱ्यांनी रडायचं नाही तर परिस्थितीशी दोन हात करून लढायचा हा मोठा संदेश यात आहे, व्हॉटस अॅपवर हा संदेश प्रचंड लोकप्रिय होतोय.

मध्यंतरी एका शहरी वर्तमानपत्रात बळीराजाची ही बोंब बोगस असल्याचा अग्रलेख प्रकाशित झाला होता, तेव्हा शेतकऱ्यांची खरी स्थिती जाणणारे हळहळले होते, मात्र तेव्हापासून व्हॉटस अॅपवर बळीराजाच्या बाजूने अनेक युवक उभे ठाकले आहेत, आणि व्हॉटस अॅपवर लिखाणाचा पाऊस सुरू झाला आहे.

बोगस बोंग असं लिहणाऱ्यांवर सारवासारवं करण्यासाठी वेळ आली, तेव्हा त्यांनी निनावी संदर्भ देत यावर लिहलं, पण ही सारवासारव केविलवाणी ठरली, कारण यात खानदेश विकास पॅकेज, मराठवाडा विकास पॅकेज, विदर्भ विकास पॅकेज ही पॅकेजही शेतकऱ्याला देण्यात आल्याचं भासवलं होतं.

प्रत्यक्षात शहरी लोकांची घरं बांधण्यासाठी ग्रामीण भागातून वाळूचा उपसा होतोय, त्यामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जातेय, दुसरीकडे वाळू उपशाच्या जड वाहनांमुळे रस्त्यांची वाट लागलीय. 

शेतीच्या पाण्यासाठी आहेत, त्या धरणांवरून शहरांचा पाणी पुरवठा वाढतोय, धरणांवर शहर पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन्स वाढल्या आहेत, मात्र सर्व बिल फाडलं जातंय ते शेती आणि शेतकऱ्यावर.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.