मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान राखून अससेल्या ठाकरे घराण्याकडे, कलेचा सुद्धा वारसा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन सध्या दक्षिण मुंबईतल्या जहांगीर कला दालनात सुरु आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी विविध मान्यवरांनी आतापर्यंत जहांगिरला भेट दिलीय. त्यातच स्वतः व्यंगचित्रकार असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा आज दुपारी जहांगीर कला दालनात जाऊन, उद्धव यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन आवर्जुन पाहिलं.
उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्र प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खास उपस्थिती लावली. दादूने काढलेली छायाचित्रं बघण्यासाठी खुद्द राज ठाकरे जहांगीरमध्ये आले.
उद्धव हा उत्तम फोटोग्राफर आहे. त्याची कला मी लहानपणापासून पाहात आलो आहे, असं कौतुकाचे उद्गार राज ठाकरे यांनी काढत दादूच्या कलेला दाद दिली. उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरवण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन १३ जानेवारीपर्यंत हे सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनातील फोटोंच्या विक्रीतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.