फेसबूकवर विनयभंग, मुंबईत आंबटशौकिनाला अटक

मुंबई पोलीसांनी अशा एका व्यक्तीला अटक केलीये. जो फेसबूकवर मुलींशी मैत्री करायचा आणि त्यांना अश्लील मॅसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवून मुलींचे विनयभंग करायचा.

Updated: Apr 13, 2015, 10:02 PM IST
फेसबूकवर विनयभंग, मुंबईत आंबटशौकिनाला अटक title=

मुंबई : मुंबई पोलीसांनी अशा एका व्यक्तीला अटक केलीये. जो फेसबूकवर मुलींशी मैत्री करायचा आणि त्यांना अश्लील मॅसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवून मुलींचे विनयभंग करायचा.

धक्कदायक म्हणजे फेसबूकच्या माध्यमातून मुलींचा विनंयभंग करणारी व्यक्ती एका बड्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे. गेल्या अनेक दिवसापासून या व्यक्तीने हा प्रकार सुरु ठेवला होता. पण मुलीने तक्रार केल्याने हा घाणेरडा प्रकार उडकीस आलाय.

हा तरुण, एका अंतरराष्ट्रीय बँकेत मोठ्या हुद्द्यावर आणि दीड लाखांपेक्षा जास्त पगार असं असताना कोणाची बुद्धी भ्रष्ट होईल आणि ती व्यक्ती गुन्हा करेल. पण असं झालय.

शोमी प्रदीप कुमार शर्मा नावाच्या या व्यक्तीने फेसबूकच्या माध्यमातून एका महिलेशी मैत्री केली आणि तिच्याशी मैत्री वाढवून तिला अश्लील मॅसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवू लागला. काही दिवस ही महिला गप्प राहिली पण, प्रदीप कुमार शर्मा याचे चाळे दिवसेंदिवस वाढतच चालले असल्याने शेवटी त्या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचे मुंबई पोलिसचे प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. 

धक्कादायक बाब म्हणजे ज्या महिलेशी शोमी प्रदीप कुमार शर्मा चँटींग करायचा त्या महिलेचे वय ५६ वर्षे आहे अणि तिने आपला तरुणपणाचा फोटो फ़ेसबुक प्रोफ़ाईल म्हणून ठेवला होता. आणि इथेच प्रदीप फसला. कारण जर एखादी तरुण मुलगी असती तर, तीने आपली बदनामी होईल या कारणास्तव पोलिसात तक्रार केली नसती.

या अश्लील प्रकाराची त्या महिलेने तक्रार केली आणि पोलिसांनी प्रदीप कुमार शर्माचे मोबाईल लोकेशन शोधून काढून त्याला कलम 354 (ए) आणि (डी) विनयभंग करणे, महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे याच बरोबर फेसबूकचा वापर करुन महिलेचा मोबाईल नंबर मिळवला म्हणून आयटी एक्ट ६७ ए नुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलीये.

त्याचबरोबर शोमी प्रदीप कुमार शर्मा याला न्यायालयात हजर केलं असता या शर्माने आणखी काही मुलींशी असे चाळे केले आहेत का याचा तपास करण्याकरता १४ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालायने दिलीये.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.