गिरगाव चौपाटीच्या आगीचं खरं कारण...

 गिरगाव चौपाटीवरील मेक इंडियाच्या महाराष्ट्र रजनी कार्य़क्रमादरम्यान लागलेल्या आगीला इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच जबाबदार असल्याचा ठपका अग्निशमन दलाच्या अहवालात ठेवण्यात आलाय. 

Updated: Feb 24, 2016, 05:40 PM IST
गिरगाव चौपाटीच्या आगीचं खरं कारण... title=

मुंबई :  गिरगाव चौपाटीवरील मेक इंडियाच्या महाराष्ट्र रजनी कार्य़क्रमादरम्यान लागलेल्या आगीला इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच जबाबदार असल्याचा ठपका अग्निशमन दलाच्या अहवालात ठेवण्यात आलाय. 

अग्निशमन दलाने मुंबई महापालिका आयुक्तांकडे हा अहवाल सोपवला असून यात इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि आयोजकांच्या निष्काळजीपणावर ठपका ठेवण्यात आलाय. या कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्वलनशील साहित्याचा वापर केल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. 

या कार्यक्रमाच्या ठिकाणी 6 LPG गॅस सिलेंडर्स तसेच 15 Co2चे गॅस सिलेंडर्स सापडले.. विशेष म्हणजे एलपीजी गॅस सिलेंडर्स आणि पायरो टेक्निक म्हणजेच शोभीवंत दारू न वापरण्याच्या सूचना फायर ब्रिगेडनं तपासणीवेळी दिल्या होत्या. तरीही या सूचनांचं उल्लंघन करण्यात आल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. 

आगीच्या माध्यमातून श्रीगणेशाची प्रतिमा साकारण्यासाठी एलपीजी गॅस कार्यक्रमस्थळी आणले गेले होते आणि या गॅसमुळेच वेगाने आग पसरल्याचं अहवालात म्हटलं गेलंय.