भाजप सरकारवर बुमरॅंग, २७ गावांसह केडीएमसीची निवडणूक

निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला जोरदार तडाखा दिलाय. कल्याण-डोंबिवलीची निवडणूक वगळलेल्या २७ गावांसह होणार असल्याचे स्पष्ट केलेय. त्यामुळे भाजपला हा जोरदार दे धक्का असल्याचे बोलले जात आहे.

Updated: Sep 10, 2015, 09:51 AM IST
भाजप सरकारवर बुमरॅंग, २७ गावांसह केडीएमसीची निवडणूक title=

मुंबई : निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला जोरदार तडाखा दिलाय. कल्याण-डोंबिवलीची निवडणूक वगळलेल्या २७ गावांसह होणार असल्याचे स्पष्ट केलेय. त्यामुळे भाजपला हा जोरदार दे धक्का असल्याचे बोलले जात आहे.

२७ गावांसह केडीएमसीची निवडणूक होणार असल्याने शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, मुदत संपण्यास सहा महिन्यांचा कालावधी असताना महानगरपालिका किंवा नगरपालिकांच्या हद्दीत बदल करू नये, असे स्पष्ट आदेश असतानाही कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतून २७ गावे वगळण्याच्या अधिसूचनेस राज्य निवडणूक आयोगाने आक्षेप घेतलाय.

निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हद्दीत बदल करू नका, असा आदेश राज्य शासनास दिला. यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारला जोरदार झटका बसलाय. तर दुसरीकडे २७ गावांमध्ये निवडणूक झालीच तर पुन्हा एकदा बहिष्काराचे अस्त्र बाहेर काढण्याची तयारी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सुरू केलेय.

केडीएमसीतून २७ गावे पुन्हा महापालिकेतून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार ही गावे महापालिकेतून वगळण्याची आणि वगळलेल्या गावांची नगरपालिका करण्याची प्राथमिक अधिसूचनाही सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. 

केडीएमसी पालिकेची मुदत ११ नोव्हेंबर रोजी संपत असून त्यापूर्वी सार्वत्रिक निवडणूक घेण्याचे घटनात्मक बंधन आयोगावर आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दे धक्का दिलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.