अल्ताफ मंझिल इमारत दुर्घटनेला दोन वर्षं, सरकारची अनास्था

मुंबईतल्या माहीमच्या अल्ताफ मंझिल इमारत दुर्घटनेला आज दोन वर्षं पूर्ण झाली. मात्र या दोन वर्षांमध्ये ज्यांचं अवघं विश्व जमीनदोस्त झालं त्या १६ कुटुंबांच्या आयुष्यात कोणताच फरक पडलेला नाही.

Updated: Jun 10, 2015, 10:56 AM IST
अल्ताफ मंझिल इमारत दुर्घटनेला दोन वर्षं, सरकारची अनास्था  title=
संग्रहीत

मुंबई : मुंबईतल्या माहीमच्या अल्ताफ मंझिल इमारत दुर्घटनेला आज दोन वर्षं पूर्ण झाली. मात्र या दोन वर्षांमध्ये ज्यांचं अवघं विश्व जमीनदोस्त झालं त्या १६ कुटुंबांच्या आयुष्यात कोणताच फरक पडलेला नाही.

या दुर्घटनेत ११ जणांचा बळी गेला होता. पुनर्वसन आणि इमारत पुनर्बांधणीच्या कामात तसंच तपासाबाबत महानगरपालिका आणि सरकारनं दाखवलेल्या अनास्थेबद्दल तिथले नागरिक नाराज आहेत.

इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या मारुती शोरूममध्ये स्ट्रक्चरल चेंजेस केल्यामुळे इमारत कोसळल्याचं पोलीस सांगतायत. या प्रकरणी शोरूमचा मालक संदीप बाफना आणि एका पालिकेच्या एका सब इंजिनियरविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. तर इमारतीचा मालक इरफान फर्निचरवाला यांनी मुंबई हायकोर्टातून अटकपूर्व जामीन मिळवला आहे. 

इमारतीमधील रहिवासी अॅडव्होकेट रिझवान मर्चंट यांची जामीन रद्द करण्याबाबतची याचिका प्रलंबित आहे. मर्चंट यांची आई, पत्नी आणि मुलाचा या दुर्घटनेत मृत्यू झाला होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.