मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मीडियापासून लांब असलेल्या एकनाथ खडसेंनी आज आपलं मौन सोडलंय.
'कृषिमंत्री म्हणून मला माझं काम करू द्या' असं खडसेंनी सोशल मीडियावर म्हटलंय.
As a respble Agri Min am focusing on farmers’ issues.
Allow me to do so instd of clarifying to baseless & plned algations
An appl to media— Eknath Khadse (@EknathKhadseBJP) June 3, 2016
खडसेंवरील आरोपांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्याकडं अहवाल दिला होता. त्यानंतर खडसेंवर कारवाई होणार की तूर्तास त्यांना अभय मिळणार, याबाबतची उत्सूकता शिगेला पोहोचली होती. एवढंच नव्हे तर खडसेंनी स्वतःहून राजीनामा द्यावा, यादृष्टीनंही हालचाली सुरू होत्या. मात्र, आपण मंत्रीपदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट संकेतच खडसेंनी आता दिलेत.