नितीन गडकरी यांच्यावर खडसेंशी चर्चेची जबाबदारी

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असताना खडसेंबाबत काय भूमिका घ्यायची या संभ्रमात पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. यासंदर्भात खडसेंशी चर्चा कुणी करायची असा प्रश्नही पक्षाला पडला होता. आता ही जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. खडसेंवर होणाऱ्या आरोपांनंतर आणि खडसेंवर कारवाई करण्यासाठी वाढत असलेल्या दबावाबाबत गडकरींनी खडसेंशी चर्चा करावी, अशी सूचना पक्षाने गडकरींना केली आहे.

Updated: Jun 3, 2016, 10:28 PM IST
नितीन गडकरी यांच्यावर खडसेंशी चर्चेची जबाबदारी  title=

मुंबई : महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असताना खडसेंबाबत काय भूमिका घ्यायची या संभ्रमात पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. यासंदर्भात खडसेंशी चर्चा कुणी करायची असा प्रश्नही पक्षाला पडला होता. आता ही जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. खडसेंवर होणाऱ्या आरोपांनंतर आणि खडसेंवर कारवाई करण्यासाठी वाढत असलेल्या दबावाबाबत गडकरींनी खडसेंशी चर्चा करावी, अशी सूचना पक्षाने गडकरींना केली आहे.

गडकरी सोडता महाराष्ट्रात खडसेंशी चर्चा करण्यासाठी त्यांच्या पेक्षा ज्येष्ठ नेता नाही. त्यामुळे गडकरींवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता गडकरी खडसेंबरोबर काय चर्चा करणार आणि खडसेंना राजीनामा द्यायला सांगणार का याबाबत आता उत्सुकता आहे.