एसीबीनंतर आता भुजबळांच्या मालमत्तेवर ईडीच्या धाडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मागील धाडसत्र सुरूच आहे. एसीबीनंतर आता ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानं भुजबळांच्या मालमत्तांवर धाडी टाकल्या आहेत.

Updated: Jun 22, 2015, 11:33 AM IST
एसीबीनंतर आता भुजबळांच्या मालमत्तेवर ईडीच्या धाडी title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मागील धाडसत्र सुरूच आहे. एसीबीनंतर आता ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानं भुजबळांच्या मालमत्तांवर धाडी टाकल्या आहेत.

मुंबई आणि नवी मुंबईतील सहा ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. यापूर्वी एसीबीनं भुजबळांच्या नाशिक, येवला, मुंबई, नवी मुंबईतील १७ मालमत्तांवर धाडी टाकल्या होत्या. त्यात भुजबळांची कोट्यवधींची संपत्ती आढळली. आता ईडीला धाडीत काय नवीन माहिती आणि कागदपत्र मिळतात, हे पाहणं औत्युक्याचं ठरेल.

दरम्यान, आपण सर्व प्रकारच्या चौकशीसाठी तयार असल्याचं छगन भुजबळ यांनी यापूर्वीच सांगितलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.