बाळासाहेबांचं स्मारक महापौर बंगल्यात नको - राज

बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक महापौर बंगल्यात नको, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Updated: Nov 18, 2015, 05:01 PM IST
बाळासाहेबांचं स्मारक महापौर बंगल्यात नको - राज  title=

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक महापौर बंगल्यात नको, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं स्मारक करण्याचा निर्णय, ही स्मारकासाठी पळवाट असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय. महापौर बंगल्याची जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी छोटी आहे.

बाळासाहेबांचं भव्य स्मारक व्हावं, महापौर बंगल्यात स्मारक झालं, तर महापौर बंगल्याची जागा शिवसेना बळकावेल असं राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.