नागपूर: माजी आमदार आणि गँगस्टर डॉन अरुण गवळी आता त्याच्या मुलाच्या लग्नाला हजर राहू शकणार आहे. डॉनला 15 दिवसांची पॅरोल रजा मंजूर झाली असून आज त्याची सुटका करण्यात आलीय.
अरुण गवळीचा मुलगा महेशचं 7 मेला मुंबईत लग्न आहे. तर 9 मे ला महालक्ष्मी रेसकोर्सच्या टर्फ क्लब इथं रिसेप्शन आहे.
एक दिवसाआड आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याच्या अटीवर 15 दिवसांसाठी पॅरोल मंजूर करण्यात आलाय. कुटुंबियांसोबत समारंभात सहभागी होण्यासाठी गवळीनं पॅरोलसाठी अर्ज केला होता. मात्र विभागीय आयुक्तांनी तो नाकारला. मग गवळीनं हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली आणि पॅरोलचा अर्ज केला. आता त्याची सुटका करण्यात आलीय.
शिवसेनेच्या नगरसेवकाच्या हत्या प्रकरणात अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.