मुंबईतल्या घरांसाठी बिल्डर्सकडून ‘दिवाळी ऑफर्स’!

मुंबईमध्ये घर विकत घ्यायचा विचार करत असाल तर निदान एकदा तरी बिल्डर्सच्या वेगवेगळ्या ऑफर्स नक्कीच बघा. मुंबईत डेव्हलप झालेल्या पण न विकलेल्या घरांच्या वाढत्या संख्येबरोबरच ग्रहकांना आकर्षित करण्यासाठी डिस्काऊंट्स आणि ऑफर दिल्या जात आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 15, 2013, 12:58 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईमध्ये घर विकत घ्यायचा विचार करत असाल तर निदान एकदा तरी बिल्डर्सच्या वेगवेगळ्या ऑफर्स नक्कीच बघा. मुंबईत डेव्हलप झालेल्या पण न विकलेल्या घरांच्या वाढत्या संख्येबरोबरच ग्रहकांना आकर्षित करण्यासाठी डिस्काऊंट्स आणि ऑफर दिल्या जात आहेत. असं असलं तरी जाणकारांच्या मते ग्राहकांना फक्त अट्रॅक्टिव्ह ऑफर्स देण्यापेक्षा घरांच्या किंमती थोड्या कमी केल्या तर त्याचा फायदा जास्त होईल.
या फेस्टिव सीझनमध्ये घर खरेदी करण्या-यांसाठी मुंबईतील बिल्डर्सने अनेक ऑफर्स दिल्यात...बिल्डर्सकडून दसरा-दिवाळी साठी काही खास सूट दिल्याच्या जाहिरातीही आहेत.
काही बिल्डर्सकडून प्रती स्क्वेअर फीट 250 ते 300 रुपयांपर्यंत कॅश डिस्काऊंट, 100 ग्रॅम सोनं, फ्री स्टॅम्प ड्यूटी आणि रजिस्ट्रेशन या सारख्या ऑफर्स आहेत. तर काही बिल्डर्स सर्विस टॅक्स, व्हॅट, एका वर्षाचा मेंटेनन्स, फ्री क्लब मेंबरशीप इतकचं काय तर फॉरेन टूरर्स चे पॅकेजसही देतायत. अनेक ठिकाणी फ्री पार्किंग स्पेसची ऑफर देऊन गि-हाईकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण या प्रोजेक्ट्समध्ये ज्या ऑफर्स देण्यात आल्यात त्या एक तर सुरवातीच्या काळातल्या आहेत किंवा घरांची किंमत जास्त असल्याने गि-हाईकांचा ओघ कमी आहे. जाणकारांच्या मते प्रॉपर्टीमध्ये इनवेस्ट करणा-यांसाठी ही चांगली संधी आहे.
पण इनवेस्ट करणा-यांनी टूर पॅकेज किंवा गिफ्ट्स घेण्या ऐवजी प्रॉपर्टीचे रेट कमी करण्यासाठी जास्त जोर द्यावा. कारण प्रॉपर्टीची किंमत कमी असल्यास लोनही कमी घ्यावं लागेल. त्यातच 20 टक्के असलेली लोन मार्जिनही कमी होईल, स्टॅम्प ड्यूटीचा खर्चही कमी येईल. जर बिल्डर या ऑफरसाठी तयार झाला नाही तर फ्री पार्किंग किंवा मेंटेनन्स सारख्या ऑफर्स लिखीत स्वरुपात घ्याव्यात त्यामुळे त्यावरुन पुढे वाद-विवाद होणार नाहीत..
मुंबई आणि जवळपासच्या भागातील तब्बल सव्वा लाख घरं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आणि त्यातच नवनवीन प्रोजेक्ट्समुळे तयार घरे विकण्यासाठी बिल्डर्सवर दबाव वाढतोय. याचाच फायदा ग्राहकांना घेता येईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.