बलात्कार प्रकरणी डीआयजी पारस्करांना अटकपूर्व जामीन

डीआयजी सुनील पारसकर यांना मुंबई सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आयपीएस अधिकारी असलेल्या सुनील पारसकर यांच्यावर एका मॉडेलने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पारस्कर यांना अटकपूर्व जामीन मिळाल्यानं अखेर त्यांना दिलासा मिळाला आहे.

Updated: Aug 12, 2014, 09:27 PM IST
बलात्कार प्रकरणी डीआयजी पारस्करांना अटकपूर्व जामीन title=

मुंबई : डीआयजी सुनील पारसकर यांना मुंबई सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आयपीएस अधिकारी असलेल्या सुनील पारसकर यांच्यावर एका मॉडेलने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पारस्कर यांना अटकपूर्व जामीन मिळाल्यानं अखेर त्यांना दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणातील तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही, डीआयजी सुनील पारस्कर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पारसकर यांना मिळालेल्या जामिनाविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहे. पीडीत मॉडेलच्या वकिलांनी ही माहिती दिली आहे. मॉडेलच्या तक्रारीनंतर सुनील पारस्कर यांच्याविरोधात मालवणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

तक्रारीत पारसकरांनी मदत करण्याचं आश्वासन दिल्यानं त्यांची वारंवार भेट होत असे. पण अनेक वेळा विविध हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावून सुनील पारस्कर यांनी लैंगिक शोषण केल्याचा मॉडेलचा आरोप आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.