अशा प्रकारे पकडला गेला दाऊदचा खास माणूस रियाज भाटी

इंडोनेशियाच्या बाली इथं छोटा राजनच्या अटकेनंतर पोलिसांना आणखी एक यश मिळालंय. पोलिसांनी दाऊदचा महत्त्वाचा सहकारी रियाज भाटी याला अटक केलीय. पोलिसांनी रियाजला छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दोन बनावट पासपोर्टसह अटक केली.

Updated: Oct 29, 2015, 02:30 PM IST
अशा प्रकारे पकडला गेला दाऊदचा खास माणूस रियाज भाटी title=

मुंबई: इंडोनेशियाच्या बाली इथं छोटा राजनच्या अटकेनंतर पोलिसांना आणखी एक यश मिळालंय. पोलिसांनी दाऊदचा महत्त्वाचा सहकारी रियाज भाटी याला अटक केलीय. पोलिसांनी रियाजला छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दोन बनावट पासपोर्टसह अटक केली.

तो दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गला जाणारी फ्लाइट पकडणार होता. तपासांत माहिती मिळाली की या बनावट पासपोर्टच्या आधारे त्यानं यापूर्वीही अनेक वेळा परदेश यात्रा केली. छोटा राजनच्या अटकेनंतर आयबी अंडरवर्ल्डशी निगडित प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवून आहे. 

आणखी वाचा - मी सरेंडर केलं नाही, भारतात परतायचंय- छोटा राजन

मुंबई पोलिसांशी निगडित खास सूत्रांनी सांगितलं की, राजनच्या अटकेनंतर दाऊदच्या खास माणसांची मिटींग होणार होती आणि तो त्याचसाठी जात होता. 

कोण आहे रियाज भाटी?

रियाज भाटी मुंबईत दाऊदचा हवालाचा सर्व कारोबार सांभाळतो. तो व्यवसायानं बिल्डर आहे. पहिले त्याचं नाव २००७ आणि २००८मध्ये खंडाळ्यात झालेला गोळीबार, २००९मध्ये मालाडमध्ये जबरदस्तीनं जमीन काबिज करण्याच्या प्रकरणात आलेलं होतं. 

आणखी वाचा - मोस्ट वॉण्टेड गँगस्टर छोटा राजनला इंडोनेशियामधून अटक

बुधवारी पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं. दोन नोव्हेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडीत पाठवण्यात आलंय. त्याच्याकडून दोन बनावट पासपोर्ट जप्त केले गेले. यातील एक पासपोर्ट G3128659 जयपूरहून २००७मध्ये फूलजी भाटी या नावानं इशू झालंय. तर दुसरं २०१३मध्ये Z2479378 रियाजच्या नावानं आहे. पहिल्या पासपोर्टवर भाटीची जन्म तारीख १२ जून १९६८ आहे तर दुसऱ्या पासपोर्टवर तारीख फेब्रुवारी १९६२ आहे. त्याच्याजवळ आणखी बनावट पासपोर्ट असण्याची शक्यता आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.