ऐका मुख्यमंत्र्याचं 'जय विदर्भ'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र विदर्भावर कोणताही प्रस्ताव नसल्याचं म्हटलं असलं, तरी देवेंद्र फडणवीस हे स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने आहेत की काय.

Updated: Aug 1, 2016, 08:40 PM IST

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र विदर्भावर कोणताही प्रस्ताव नसल्याचं म्हटलं असलं, तरी देवेंद्र फडणवीस हे स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने आहेत की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण नितेश राणे यांनी टवीटरवर मुख्यमंत्र्यांना जय विदर्भ म्हणत असतानाचा व्हिडीओ टवीट केला आहे. 

मुंबई ंमहापालिका निवडणुकीआधी बाहेर आलं मनातलं गुपित?

स्वतंत्र विदर्भावर कोणताही प्रस्ताव नाही असं उत्तर मुख्यमंत्री देत असले तरी मुख्यमंत्र्यांच्या मनात भलतच काही तरी आहे असावं हे या व्हिडीओवरून दिसतंय, हा व्हिडीओ ते मुख्यमंत्री होण्यापूर्वीचा असला तरी, मुख्यमंत्री स्वतंत्र विदर्भ होण्याच्या बाजूने असतील असू शकतात असं या व्हिडीओवरून दिसून येतंय.