'लालबागच्या राणी'चा उद्घाटनाआधीच ट्रॅक निखळला

'लालबागची राणी' म्हणून ज्या मोनो रेल्वे मार्गाची काही दिवसांपूर्वी चाचणी झाली होती. त्या मोनो रेल्वेच्या करी रोड ते साई बाबा नगर या स्थानकादरम्यान मोनोचा ट्रॅक निखळलाय.

Updated: Oct 8, 2016, 08:09 PM IST
'लालबागच्या राणी'चा उद्घाटनाआधीच ट्रॅक निखळला title=

मुंबई : 'लालबागची राणी' म्हणून ज्या मोनो रेल्वे मार्गाची काही दिवसांपूर्वी चाचणी झाली होती. त्या मोनो रेल्वेच्या करी रोड ते साई बाबा नगर या स्थानकादरम्यान मोनोचा ट्रॅक निखळलाय.

मोनोचा ट्रॅक अशा पद्धतीनं निखळल्यामुळे स्थानिक राहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. जर या मार्गावर मोनो रेल्वे सुरू असती तर मोठी दुर्घटना घडली असती, असं म्हणत स्थानिकांनी मोनो प्रशासनावर रोष व्यक्त केलाय.

दरम्यान, तांत्रिक कारणास्तव ही घटना झाली आहे. हा ट्रॅक निखळण्याचं नेमकं कारण काय, याचा शोध घेतला जाईल, अशी सारवा - सारव मोनोचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी केलीय.