मुंबई : आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव पास करणे, ही लोकशाहीची हत्या आहे, देवेंद्र फडणवीस हे विश्वासदर्शक ठराव जिंकू शकले नाहीत, सिद्ध करू शकले नाहीत, म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे.
विश्वासदर्शक ठराव हा मतदानाने सिद्ध करण्यात यावा, अशी आमची स्पष्ट मागणी आहे. आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव पास करणे ही परंपरा नाही, केंद्रात एकदा अटल बिहारी यांचं सरकार एका मतामुळे गडगडलं आहे.
विश्वासदर्शक ठराव नव्याने, मतदानाने घटनात्मक पद्धतीने घेण्यात यावा, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे करणार आहोत, ही मागणी मान्य होईपर्यंत काँग्रेस विधानसभेचं कामकाज चालू देणार नसल्याचं असं माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.