मुंबईतील मोकळ्या मैदानांबाबत घेतलेल्या पालिका निर्णयाला CMची स्थगिती

 मुंबईतल्या मोकळ्या मैदानांबाबत महापालिकेनं घेतलेल्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरती स्थगिती दिलीय. मुंबईकरांच्या वाढत्या नाराजीमुळं भाजपनं घुमजाव करत या निर्णय़ाला विरोध दर्शवला. दरम्यान, शिवसेनेच्या धोरणाविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत विरोध केला होता.

Updated: Jan 16, 2016, 08:41 AM IST
मुंबईतील मोकळ्या मैदानांबाबत घेतलेल्या पालिका निर्णयाला CMची स्थगिती title=

मुंबई : मुंबईतल्या मोकळ्या मैदानांबाबत महापालिकेनं घेतलेल्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरती स्थगिती दिलीय. मुंबईकरांच्या वाढत्या नाराजीमुळं भाजपनं घुमजाव करत या निर्णय़ाला विरोध दर्शवला. दरम्यान, शिवसेनेच्या धोरणाविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत विरोध केला होता.

अधिक वाचा : मुंबईतील मोकळ्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव : राज ठाकरे

तसंच हा निर्णय रद्द करण्यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन त्याना हस्तक्षेप करण्याची मागणी केली. त्यानंतर तात्काळ मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला स्थगिती दिली. तर दुसरीकडे या निर्णयाचे राज ठाकरे यांनी स्वागत केले आहे. मुख्यमंत्र्यांनी या निर्णयावर ठाम राहावे, असे म्हटले आहे.

महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने इतर पक्षांच्या मदतीने बहुमताच्या जोरावर हा निर्णय घेतला असला, तरी मनसेचा त्याला विरोध आहे. या विरोधात पक्षातर्फे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असून, कोणताही राजकीय रंग न देता मुंबईतील नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती.