मुंबईतही ऑड-ईव्हन फॉर्म्युला; हायकोर्टाच्या सूचना

दिल्लीच्या धर्तीवर मुंबईतही प्रदूषण कमी करण्याकरता राज्य सरकारने ऑड-ईव्हन  डे फॉर्म्युल्याचा गंभीरतेनं विचारा करावा, अशा सूचना मुंबई हायकोर्टानं दिल्या आहेत.

Updated: Jan 15, 2016, 05:41 PM IST
मुंबईतही ऑड-ईव्हन फॉर्म्युला; हायकोर्टाच्या सूचना title=

मुंबई : दिल्लीच्या धर्तीवर मुंबईतही प्रदूषण कमी करण्याकरता राज्य सरकारने ऑड-ईव्हन  डे फॉर्म्युल्याचा गंभीरतेनं विचारा करावा, अशा सूचना मुंबई हायकोर्टानं दिल्या आहेत.

मुंबईत दिल्लीच्या तुलनेत गाड्यांची संख्या कमी असली तरीही छोटे रस्ते आणि खराब दर्जाच्या रस्त्यांमुळे मुंबईत खूप ट्रॅफिक होते. परीणामी मुंबईतल्या हवामानात कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे.

तसचं डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांची संख्या मुंबईत जास्त असल्याने प्रदूषण वाढीचे ते एक मोठे कारण आहे. त्यामुळे दिल्लीच्या धर्तीवर मुंबईतही प्रदूषण कमी करण्याकरता ऑड-इव्हन डे फॉर्म्युल्याचा विचार करावा, अशा आशयाची याचिका शादाब पटेल यांनी केलीय. 

दिल्लीप्रमाणे मुंबईतही डिझेल गाड्यांच्या रजीस्ट्रेशनवर निर्बंध आणावेत अशी ही मागणी याचिकाकर्त्याने केलीय.