मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आघाडीतलं 'दुखणं'

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतील काही बाबी स्पष्टपणे सांगितल्या आहेत. पीटीआयशी बोलतांना न डगमगता मुख्यमंत्र्यांनी काही मतं मांडली आहेत.

Updated: Aug 31, 2014, 11:26 AM IST
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आघाडीतलं 'दुखणं' title=

मुंबई : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतील काही बाबी स्पष्टपणे सांगितल्या आहेत. पीटीआयशी बोलतांना न डगमगता मुख्यमंत्र्यांनी काही मतं मांडली आहेत.

काँग्रेस कार्यकर्ते हे राष्ट्रवादीवर नाराज आहेत, मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तोडण्यास आपला ठाम नकार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी बिनधास्त बोलून दाखवलंय.

केंद्रात आणि राज्यात नेत्यांची बोलणी होते, वाटाघाटी होतात, आघाडी होते. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस दिसून येते आणि ही पराभवास कारणीभूत ठरते. कारण स्थानिक पातळीवर स्वत:ची ताकत दाखवण्यासाठी, एकमेकांविरोधात कारवाया केल्या जातात. यामुळे स्थानिक ठिकाणचे काँग्रेस कार्यकर्ते राष्ट्रवादीवर नाराज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर अजून राष्ट्रवादी प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुरू असलेली सुंदोपसुंदी कार्यकर्त्यांमध्ये प्रभावीपणे जाऊन पोहोचते आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ निर्माण होते हे दिसून येतंय. लोकसभा पराभवानंतर आणि विधानसभेच्या जागावाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मतभेद दिसून येत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.