विद्यासागर राव यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ

आज, विद्यासागर राव यांनी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. राजभवनात नवीन राज्यपालांचा शपथविधी सोहळा पार पडला.

Updated: Aug 30, 2014, 10:02 PM IST
विद्यासागर राव यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ title=

मुंबई : आज, विद्यासागर राव यांनी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. राजभवनात नवीन राज्यपालांचा शपथविधी सोहळा पार पडला.

मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी विद्यासागर राव यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

गेल्या आठवड्यात के. शंकरनारायणन यांनी बदली झाल्यानं आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर गुजरातचे राज्यपाल ओमप्रकाश कोहली यांच्याकडे राज्याचे प्रभारी राज्यपाल म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. बुधवारी विद्यासागर राव यांचे महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून घोषणा करण्यात आली होती.

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेले राज्यपाल विद्यासागर राव कोण आहेत  यावर एक नजर टाकूयात...
* केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये 1999ला गृहराज्यमंत्री
* बाराव्या आणि तेराव्या लोकसभेत आंध्रप्रदेशमधील करिमनगरचे खासदार
* आंध्रप्रदेश विधानसभेत तीन वेळा आमदार
* आंध्रप्रदेश विधानसभेत भाजपचे विधीमंडळ पक्षनेतेपद
* व्यवसायाने वकील प्रभावी वक्ते अशी ओळख

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.