मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे सध्या सरकारवर कमालीचे नाराज आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांना अधिकार मिळत नसल्याची तक्रार करून शिंदे गेल्या काही दिवसातल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांना सातत्यानं गैरहजर राहत आहेत.
सलग पाच बैठकांना शिंदेंनी दांडी मारली आहे. याशिवाय शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांची कामं होत नसल्यानं शिंदेची नाराजी असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
जर पावसाळी अधिवेशनाआधी परिस्थिती सुधारली नाही, तर शिंदे अधिवेशनावरही बहिष्कार घालण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
दरम्यान, आपण नाराज नसल्याचं, एकनाथ शिंदे यांनी 'झी २४ तास'शी बोलताना सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.