मुंबई : कोपर्डी बलात्कारप्रकरणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपांवर आज मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्ततर दिले. माझ्या कामाचं मूल्यमापन जनता करेल, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणेंना जोरदार टोला हाणला.
राणेंनी केलेल्या प्रत्येक आरोपाला मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तरं दिली. त्याचप्रमाणे गृहमंत्रीपदाचा राजीनामा मागणाऱ्या राणेंना उत्तर देताना जिनके घर शिशे के होते है...वो दुसरो के ऊपर पथ्थर नही मारते असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणेंना प्रतिहल्ला केला.
राज्याच्या एका मंत्र्यानं महिला अधिका-यावर अत्याचार केले, असा खळबळजनक आरोप नारायण राणेंनी काल विधानपरिषदेत केला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनी जोरदार उत्तर दिलंय. असा कुणीही मंत्री असेल तर त्याला ताबडतोब बाहेर काढीन, असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलंय.
मुख्यमंत्र्यांनी कोपर्डी प्रकरणातल्या आरोपीचा फोटो पत्रकार परिषदेत दाखवून धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपांतली हवा काढली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे आरोपीचा फोटो दाखवून कायद्याचा भंग केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला होता. त्यालाही मुख्यमंत्र्यांनी रोखठोक उत्तर दिलं. मला कायदा कळतो, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांचे आरोप खोडून काढले.
- कॅबिनेट मंत्र्याने क्लास वन महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन केले तर, नारायण राणे तुम्ही तातडीने नजरेस आणून द्या
- लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष लोकशाहीच्या रथाची चाक
- कोपर्डी घटनेवरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांची नारायण राणेंवर जोरदार टीका.
- महाराष्ट्रासाठी मी एकटाच मुख्यमंत्री म्हणून सक्षम, कायद्याच पालन म्हणून घटनास्थळी गेलो नाही.
- कोपर्डी प्रकरणाला जातीय वळण देणं योग्य नाही, आरोपीला जात नाही
- पुष्कळ दिवसांनी राणे विरोधकांच्या बाकावर असल्याने त्यांनी काल राजकीय भाषण केले.
- मी एकच मुख्यमंत्री आहे आणि सक्षम आहे.
- आपल्याला ४० वर्षांचा अनुभव आहे पण मला गृह खाते अनुभव किती आहे हे आकडे, माझे काम आणि जनता सांगेल.
- रमेश गोवेकर, अंकुश राणे च काय झाल या मागण्या भाई (भाई जगताप ना) तुम्हीच केल्या होत्या.
- सिंधुदुर्ग मध्ये कोणावर काय गुन्हे हे मी सांगितलं तर पार्टी ऑफ क्रिमिनल कोण हे लक्षात येईल.
- सावंतवाडीमध्ये किती कलम आहेत काय सांगू.
- जो शिशे के घर में रेहते है, वो दुसरे पर पत्थर नही फेका करते, हा डायलॉग मी ऐकला होता.
- महिला अधिकाऱ्याबाबत आपण बोललात असं असेल तर आपण तातडीने निदर्शनास आणून दिल पाहिजे. राजकारण करण्यासाठी ठेवलंय का ?
- जे तिकडे ते इकडे आहे. आम्ही पण बाहेर काढू. मला दम नाही द्यायचा. मी शांत आणि संयमी आहे, असं राणे पण म्हणाले होते. मी विरोधकात असताना पण बोलायची गरज पडली.
- आम्ही सुडाच राजकारण करतो, असं राणे साहेब तुम्ही म्हणालात. पण तुम्ही सज्जन, सत्वशील आहात तर तुम्ही कशाला घाबरणार? असंही तुम्ही घाबरत नाही.
- तुमच्या पक्षातल्या एका तरी व्यक्ती बदल तुम्ही चांगलं बोलतात का ? विलासराव, अशोक चव्हाण, माणिकराव, पृथ्वीराज यांना काय म्हणाला होतात माझ्याकडे रेकॉर्ड आहे.
- तुमचं म्हणण गांभीर्याने घेणार नाही कारण तुम्ही नंतर बदलता
- एखादा मंत्री गुन्हेगार म्हणून सापडला तर तो पदावर राहणार नाही. मात्र तुम्ही पोकळ आरोप करत साप साप म्हणून काठी बडवत राहिलात तर एकही मंत्री राजीनामा देणार नाही
दरम्यान, नारायण राणे यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करावा असे पत्र सभापति यांना दिल्याची माहिती आज भाजपचे विधानपरिषदेतले आमदार प्रवीण दरेकर यांनी दिलीय. हक्कभंगाचा हा प्रस्ताव दाखल करून घ्यावा आणि विशेषाधिकार समितिकड़े पाठवावा अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.