छगन भुजबळ कंपनीविरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, तसंच समीर आणि पंकज भुजबळ यांच्यावर नवे गंभीर आरोप केलेत. या तिघांनी आपल्या ११ कंपन्यांचे आयकर परतावे गेल्या ५ वर्षांत भरलेच नसल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 21, 2014, 07:12 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, तसंच समीर आणि पंकज भुजबळ यांच्यावर नवे गंभीर आरोप केलेत. या तिघांनी आपल्या ११ कंपन्यांचे आयकर परतावे गेल्या ५ वर्षांत भरलेच नसल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय.
या पाच वर्षांत त्यांची संपत्ती १२ हजार टक्क्यांनी वाढल्याचा दावा त्यांनी केलाय. याविरोधात सोमय्यांनी आर्थिक गुन्हे विभाग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३३० पानी तक्रार दाखल केलीये.
भुजबळांवर कारवाईबाबत एसीबीनं गेल्या दोन वर्षांत तीन वेळा सरकारकडे विचारणा केली. मात्र प्रत्येक वेळी सरकारनं नकार दिल्याचा दावा सोमय्यांनी केलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.