मुंबई : मनसेनेने आपली ताकद वाढवलेय. आणखी एक नगरसेवक इंजिनाला जोडून आपली संख्या दहा केली. त्यामुळे मनसेच्या हाती केडीएमसीच्या सत्तेच्या चाव्या आल्यात. त्यामुळे ठाकरे बंधुंचे मामा चंदूमामा वैद्य यशस्वी मध्यस्ती करु शकतील का, याचीच आता उत्सुकता लागलेय.
अधिक वाचा : चंदूमामा ठाकरे बंधुंचे करणार 'कल्याण'
काल चंदूमामा वैद्य यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, उद्धव आणि राज ठाकरे या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते. सामनातील वृत्त वाचून आपल्याला खात्री पटलेय की, दोघांना एकत्र यायला हरकत नाही. महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोघांनी एकत्र यावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे, मामा म्हटले होते. मात्र, मनसेनेने आपला कोणताही नगरसेवक फुटू नये म्हणून स्वतंत्र गट स्थापन केलाय. तसे पत्र कोकण आयुक्तांना दिले. त्यामुळे मनसेची भूमिका आता सत्तेसाठी महत्वाची ठरणार आहे.
अधिक वाचा : शिवसेनेचे भाजपला प्रत्युत्तर, आम्ही आमचा पर्याय शोधू : उद्धव ठाकरे
दरम्यान, कल्याण डोंबिवलीत सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरु असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवी खेळी खेळल्यामुळे चर्चा अधिक रंगली आहे. आपल्या एक समर्थकासह १० नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केलाय. कल्याण डोंबिवलीत सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही गटांकडून संख्याबळासाठी गळ टाकले जात आहेत.
नगरसेवकांची फोडाफोडी टाळण्यासाठी मनसेनं १० जणांचा गट करून कोकण आयुक्तांना पत्र दिलंय. नऊ नगरसेवक आणि एक अपक्ष समर्थक नगरसेवकासह १० जणांचा असा हा गट मनसेनं स्थापन केलाय. त्यामुळे मनसे शिवसेनाला मदत करणार की भाजपला याची उत्सुकता अधिकच वाढली आहे. शिवसेनेचे संख्या बळ सर्वाधिक आहे. शिवसेना ५२ आणि भाजप ४२, आणि आता मनसे + अपक्ष १० असे संख्याबळ आहे. काँग्रेस ४, राष्ट्रवादी २ आणि अपक्ष १० अशी संख्या त्यामुळे मनसेला अधिक महत्व आले आहे. बहुमतासाठी शिवसेनेला ९ नगरसेवक कमी पडत आहे. पालिकेत मॅजिक फिगर ६१ आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.