जाहिरात भोवली : शाहरुख, अजय, गोविंदा, मनोजला रितसर नोटीस

पान मसाल्याची जाहिरात करणं बॉलिवूडच्या कलाकारांना भोवलंय. पानमसाल्याची जाहिरात करणाऱ्या कलाकारांना एफडीए नोटीसा बजावल्यात. यात शाहरुख खान, अजय देवगण, गोविंदा आणि मनोज वाजपेयी यांचा समावेश आहे.

Updated: Nov 5, 2015, 01:43 PM IST
जाहिरात भोवली : शाहरुख, अजय, गोविंदा, मनोजला रितसर नोटीस  title=

मुंबई : पान मसाल्याची जाहिरात करणं बॉलिवूडच्या कलाकारांना भोवलंय. पानमसाल्याची जाहिरात करणाऱ्या कलाकारांना एफडीए नोटीसा बजावल्यात. यात शाहरुख खान, अजय देवगण, गोविंदा आणि मनोज वाजपेयी यांचा समावेश आहे.

राज्यात पान मसाल्यावर बंदी असतानाही त्याची जाहिरात करण्यात येते आहे. या जाहिराती अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण, गोविंदा आणि मनोज वाजपेयी करत आहेत. त्यांना रितसर नोटीस पाठविण्यात आलेय. 

संबंधित कंपनी आणि कलाकारांवर नियमानुसार कारवाई करणार असल्याची माहिती एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर ही नोटीस बजावण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.