www.24taas.com,मुंबई
मुंबई महापालिकेतील मनसे नगरसेविका गीता बाळा चव्हाण वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांचे नगरसेवक पद राहणार की जाणार याचीच चर्चा आता सुरू झाली आहे.
गीता चव्हाण सातांक्रुझ इथल्या वॉर्ड क्रमाकं ९२ मधून ओबीसी आरक्षण कोट्यातून विजयी झाल्या आहेत. गीता चव्हाणा यांनी जात प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडे सादर करताना बोगस शाळेचा दाखला दिला आहे. तसंचे उस्मानाबाद इथला खोटा वास्तव्याचे पुरावा दिल्याच आरोप याचिकाकर्ता मोहन लोकेंगावकर यांनी केला आहे. याबाबत त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात नगरसेविका गीता चव्हाण यांच्याविरोधात याचिक सादर केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र चार महिन्यांत पुन्हा कोकण भवनमधून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गीता चव्हाण यांचे जात प्रमाणपत्राबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले तर त्यांचे नगरसेवक पद राहणार की जाणार याची उत्सुकता आहे.