व्हॉट्सअॅप ग्रुप सोडल्याने भाजप नेत्यांवर हल्ला

व्हॉट्सअॅप ग्रुप सोडल्याने भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप उपाध्याय आणि उपाध्यक्ष यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. याप्रकरणी भाजपच्या गणेश पांडे आणि समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिंडोशी येथे काल रात्री घडली ही घटना घडली.

Updated: Mar 18, 2016, 04:59 PM IST
व्हॉट्सअॅप ग्रुप सोडल्याने भाजप नेत्यांवर हल्ला  title=

मुंबई : व्हॉट्सअॅप ग्रुप सोडल्याने भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप उपाध्याय आणि उपाध्यक्ष यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. याप्रकरणी भाजपच्या गणेश पांडे आणि समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिंडोशी येथे काल रात्री घडली ही घटना घडली.

भाजपचे उत्तर मुंबई युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप उपाध्याय यांच्यावर भाजपच्याच कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री दिंडोशी येथे घडली. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या उपाध्याय यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.  

संदीप उपाध्याय यांच्यावर पक्षातील गटबाजीतून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. उपाध्याय आणि त्यांच्या सहकाऱ्यावर दिंडोशी भागात हल्लेखोरांनी शीतपेयाची बाटली आणि चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात दोघेही जखमी झालेत. हा हल्ला करणारे भाजपचेच कार्यकर्ते होते, असा आरोप उपाध्याय यांच्या समर्थकांनी केलाय.

भाजपचे उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष मोहित कंबोज आणि भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष गणेश पांडे यांच्या समर्थकांनी हा हल्ला घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांच्या राजकारणाला कंटाळून पांडे यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून उपाध्याय बाहेर पडले होते. त्याच रागातून उपाध्याय यांच्यावर हा हल्ला करण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.