मुंबई : दिल्लीतील निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात नव्या घडामोडींचे संकेत मिळाले आहेत. राष्ट्रवादीने राज्यातील भाजपचे सरकार पाडण्यासाठी थेट शिवसेनेला मदत करण्याचे जाहीर केलेय. त्यामुळे भाजपची शिवसेनेमुळे होणारी गोची अधिक झालेय. शिवसेनेने भाजपला टोला लगावला होता, लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील विजयानंतर अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले होते. त्यावेळी प्रतिक्रिया देताना म्हटले होते, लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते. उद्धव ठाकरेंचा भाजपला सणसणीत टोला बसल्याने भाजपने आक्रमक भूमिका घेतली. जर तुम्हाला जमत नसेल तर सत्तेतून बाहेर पडा, असे थेट आमदार आशिष शेलार यांनी म्हटले. त्यामुळे सेना आणि भाजपमधील वाद अधिकच उफाळला.
शिवसेना जर राज्यातील सरकार पाडणार असेल, तर राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देईल, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. मलिक यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणात वेगळेच रंग लागलेत.
दिल्लीत भाजपवर पराभवाची नामुष्की ओढावल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला आणि लाटेपेक्षा त्सुनामी कधीही मोठी असते, असं म्हणत दिल्लीचा पराभव मोदींचाच आहे. जनतेला गृहित धरु नका, असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे. उद्धव यांच्या इशाऱ्याने भाजपने लगेच आक्रमक भूमिका घेतली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.