रात्री १०.३५
- माझ्याकडे काही प्रस्ताव आलेला नाही. आम्हीच भाजपला दिलाय - उद्धव
- पाय मोकळे करण्यासाठी शिवाजी पार्ककडे आलो - उद्धव
- युतीत जागा वाटपाबाबत चेंडूची टोलवाटोलवी...
- उद्धव ठाकरे यांनी भाजपकडे चेंडू भिरकावला
सायंकाळी ७.3७ वाजता :
- शिवसेनेच्या कोर्टात जागावाटपाचा चेंडू - देवेंद्र फडणवीस
सायंकाळी ७.30 वाजता :
- उद्धव ठाकरे आणि माथूर यांच्यात रात्री बैठक होणार
सायं ७.२७ वाजता
- दोन्ही बाजूंच्या नेत्यांची बैठक झाली, रात्री फॉम्युला ठऱणार – सुभाष देसाई
- चर्चा सकारात्मक झाली – सुभाष देसाई
- आतून चर्चा सुरू होती – आदित्य ठाकरे
- भ्रष्ट काँग्रेसची सरकार हटविण्याचा मनोदय – आदित्य
- भगवे सरकार महाराष्ट्रात आणण्याचा
- महाराष्ट्रासाठी चांगले त्यासाठी शिवसेना सदैव तयार – आदित्य ठाकरे
- आमच्यात अहंम नाही, महाराष्ट्राचा हितासाठी एकत्र राहणार – आदित्य ठाकरे
- २५ वर्षांची युती आहे, दोघांनाही युती तोडायची नाही – देवेंद्र फडणवीस
- आता चेंडू शिवसेनेच्या कोर्टात, त्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा – देवेंद्र फडणवीस
सायंकाळी ६.१६ वाजता :
- युती कायम ठेवण्यावर शिवसेना-भाजप नेत्यांचे एकमत
- भाजप - शिवसेना यांच्यात युती कायम ठेवण्याची चर्चा
- भाजपचा नवा फॉर्म्युला समजून घेण्यासाठी भेटीला गेलेल्या आदित्य ठाकरे, सुभाष देसाई यांच्या बैठकीत चर्चा
दुपारी ५.४५ वाजता :
- भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी ओ. पी. माथूरच्या भेटीसाठी युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई रवाना
- भाजपचा नवा फॉर्म्युला समजून घेण्यासाठी गेले भेटीला
- शिवसेनेची सकारात्मक भूमिका
- युती टीकावी यावर एकमत
- भाजपच्या नव्या प्रस्तावावर आता चर्चा होणार
दुपारी ३.४५ वाजता :
- भाजपने नेहमी संयमाची भूमिका घेतली - मुनगंटीवार
- युती कायम ठेवण्याची भाजपची भूमिका - मुनगंटीवार
- महायुतीचा तिढा अजून कायम - मुनगंटीवार
- जागांचा नवा प्रस्ताव भाजपने शिवसेनेकडे पाठविला - मुनगंटीवार
- चर्चा सुरू ठेवावी, शिवसेनेवर दबाव वाढला
- नेहमी शिवसेनेने एनडीए विरोधात भूमिका घेतली तरी भाजपने समजदारीची भूमिका घेतली - मुनगंटीवार
- चेंडू आता शिवसेनेच्या कोर्टात टाकला
- शिवसेनेला आम्ही लोकसभेच्या सहा जागा दिल्या. पण त्यांनी आम्हांला कधीच जागा सोडल्या नाही - एकनाथ खडसे
- भाजपने त्याग का करावा अशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांना मान्य नाही - एकनाथ खडसे
- २५ वर्षांपूर्वी ३२ जागा भाजप लढवत होते पण आम्ही कालांतराने युती टिकण्यासाठी शिवसेनेला ६ जागा दिल्या होत्या - एकनाथ खडसे
- रामदास आठवले यांचीही जागा भाजपने आपल्या कोट्यातून दिली - एकनाथ खडसे
- शिवसेनेला भाजपचा थेट इशारा... राष्ट्रवादीच्या घशात जागा घालण्याची चूक करू नका - मुनगंटीवार
- कायम भाजपनेच त्याग का करावा - मुनगंटीवार
- माध्यमांद्वारे आम्ही शिवसेनेकडे प्रस्ताव पाठविणार नाही - मुनगंटीवार
दुपारी ३.३० वाजता :
* पाच तासानंतरही सेना-भाजपकडून कोणताही खुलासा नाही
* युती कायम ठेवण्याबाबत निर्वाळा नाही
* भाजपची खलबतं, शिवसेनेवर वाढता दबाव
* जो निर्णय होईल तो पत्रकार परिषदेत सांगू
* नितीन गडकरी आज मुंबईत येणार नाहीत - सूत्रांची माहिती
दुपारी ३.०० वाजता :
* शिवसेनेचा स्वाभिमान आता जागा झाल्याचं दिसतंय, भुजबळांची 'युती' तुटण्याच्या बातमीवर प्रतिक्रिया
* स्वबळावर लढल्यास सर्वाचीचताकद समजेल
* एक एक पाऊल मागे घेत युती तुटू देऊ नका, रामदास आठवलेंचा सेना - भाजपला सल्ला
दुपारी २ . ३० वाजता :
नितीन गडकरी आणि पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यातील बैठक संपली, युतीबाबत मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता
शिवसेनेना जागावाटपाबाबत अंतिम आकडा दुपारी 3 वाजता जाहीर करणार
दुपारी २ वाजता :
- युती अभेद्य ठेवण्याचे प्रयत्न सुरू - राजू शेट्टी
- महाराष्ट्राचे ग्रहण सुटावे यासाठी आम्ही महायुतीत सामील झालो होतो - राजू शेट्टी
- महाराष्ट्रातील महायुतीबाबत नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्या बैठक सुरू
- महायुती टिकवा मोदींचा भाजप नेत्यांना सल्ला
- नितीन गडकरी मुंबईत येणार नाही
- तब्येत खराब असल्याने नाही येणार मुंबईत
यापूर्वी गेल्या २५ वर्षापासूनची शिवसेना भाजप युती आता जवळपास संपुष्टात आलीय. येत्या विधानसभा निवडणुकीत 'युती' म्हणून नाही तर दोन्ही पक्ष आपापले मार्ग निवडत सामोरे जाताना दिसतील, अशी चिन्हं आहेत.
जागावाटपाबाबत शिवसेनेनं दिलेला प्रस्ताव भाजपनं फेटाळलाय. भाजपला मित्रपक्षांसह ११९ जागा देण्याचा शिवसेनेचा प्रस्ताव होता. या ११९ जागांपैकी ९ जागा भाजपनं घटकपक्षांना सोडाव्यात तर उरलेल्या १६९ पैकी ९ जागा शिवसेना घटकपक्षांना सोडेल असा प्रस्ताव शिवसेनेनं ठेवला होता. मात्र, भाजपनं हा प्रस्ताव फेटाळलाय. त्यामुळं युती तुटण्याची शक्यता वर्तवली जातेय.
भाजपनं स्वतंत्र प्रचार सुरू केल्याचं दिसतंय. भाजप अध्यक्ष अमित शाह प्रचारसभेतल्या भाषणांमध्ये काँग्रेसमुक्त भारतासोबत भाजपयुक्त महाराष्ट्राचा नारा देत आहेत. गावा-गावात जाऊन भाजप कार्यकर्त्यांचं जाळं सशक्त करण्याच्या स्पष्ट सूचना ते देत आहेत. त्यांच्या कोल्हापूर आणि चौंडीतल्या भाषणांमध्ये महायुतीचं सरकार असा कुठेही उल्लेख न करता भाजप सरकार आणा असंच ते बजावताना दिसत आहेत. त्यामुळं भाजपनं स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण केली आहे की काय? अशी चर्चांना उधाण आलंय.
अमित शाहांच्या दौऱ्यात दिसली चिन्हं
दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहनी युतीच्या भवितव्याबद्दल स्पष्ट संकेत दिले आहेत. या दोन दिवसांत एकुण चार जाहिर कार्यक्रमात अमित शाह यानी युतीचा, खास करून शिवसेनेचा किंवा ठाकरे नावाचा उल्लेख पूर्णपणे टाळला. उलट भाजपच्या कामगिरीबद्दल, राज्यातील घोटाल्यांबद्दल उल्लेख करत भाजपची ‘एकला चलो रे’ अशीच वाटचाल असेल असे संकेत दिलेत असं म्हणायला जागा आहे.
उलट राज्य निवडणुक प्रभारी ओम माथुर यांच्या मार्फत जागावाटपाबाबत उद्वव ठाकरे यांच्याशी संपर्क साधत आपण स्वत: थेट बोलणार नसल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं. त्यामुले भाजप सेनेच्या दबावतंत्रापुढे झुकणार नाही हेच अमित शाह यांनी दाखवून दिल्याचं भाजप नेत्याचं म्हणणं आहे. त्यातच अमित शाह यांचा दौरा संपल्यावर काही मिनिटातच, ११९ जागांमध्ये घटक पक्षांसह तडजोड करण्याची सेनेची ऑफर धुडकावत मागे हटणार नसल्याचं भाजपने दाखवन दिलं आहे. सेना अणि भाजपाने आखलेल्या जोर बैठकांचा सपाटा लक्षात घेता पुढील काही तास हे युतीचे भवीतव्य आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत हे निश्चित.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.