मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपावरून प्रचंड तेढ निर्माण झाली आहे.
‘काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नसल्याने दुखावलेल्या राष्ट्रवादीने काँग्रेसला अल्टीमेटम दिलंय. ते संपायला काही तास शिल्लक असल्याची’ माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलीय.
दोन दिवसांत राष्ट्रवादीची प्रतिक्षा संपेल असं दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीने स्पष्ट केलं होतं. आता ती वेळ संपत आली आहे. दुसरीकडे काँग्रेसची वेगळी भूमिका असेल तर आमचीही तयारी आहे, आम्हीही वेगळी भूमिका घेऊ, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काँग्रेसला दिला आहे.
दुसरीकडे, २००४ साली जास्त जागा येऊनही राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं होतं... यावेळी ती चूक करणार नाही, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.