भाजपने थेट 'मातोश्री'लाच केलं लक्ष्य

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमध्ये सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांची धार दिवसागणिक वाढतेय. भाजपनं तर आता थेट 'मातोश्री'लाच लक्ष्य करण्यास सुरुवात केलीय. शिवसेनेनही भाजपचा हा हल्ला मोडून काढण्याची व्यूहरचना आखली आहे.

Updated: May 11, 2016, 01:32 PM IST
भाजपने थेट 'मातोश्री'लाच केलं लक्ष्य  title=

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमध्ये सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांची धार दिवसागणिक वाढतेय. भाजपनं तर आता थेट 'मातोश्री'लाच लक्ष्य करण्यास सुरुवात केलीय. शिवसेनेनही भाजपचा हा हल्ला मोडून काढण्याची व्यूहरचना आखली आहे.

देशात भाजपचे सरकार आहे. राज्यात भाजपची सत्ता आहे आणि आता भाजपला देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर पहिल्यांदा आपला महापौर बसवायचा आहे. ही महत्वकांक्षी संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी भाजपनं नियोजनबद्ध रणनिती आखलीय. त्यानुसार महापालिका निवडणुकीला आता अवघे आठ महिने शिल्लक राहिले असताना शिवसेनेला बदनाम करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे.

महापालिकेतले नवेनवे घोटाळे दररोज बाहेर काढले जात आहेत. प्रमुख सत्ताधारी म्हणून त्यासाठी शिवसेनेला जबाबदार ठरवलं जातंय. शतप्रतिशत भाजप या योजनेअंतर्गत मुंबईचा प्रत्येक गल्लीबोळ पिंजून काढला जातोय. आणि आता तर थेट "मातोश्री"लाच लक्ष्य करून शिवसेनेला अस्वस्थ करण्याची व्यूहरचना आखली गेली आहे.

भाजपची व्यूहरचना मोडून काढण्यासाठी शिवसेनाही संपूर्ण ताकदीनिशी सज्ज झालीय. भाजपच्या आरोपांना तोडीस तोड उत्तर दिलं जातंय.