अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर बेस्टच्या बसला आग

अंधेरी घाटकोपर लिंक रोडवर चकाला येथे दुपारी 2 च्या सुमारास बेस्टच्या बसला आग लागली. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्यानं बस थांबवली आणि प्रवाशांना बाहेर काढलं. तातडीनं अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. मात्र तोपर्यंत बसनं पूर्ण पेट घेतला होता.

Updated: Jan 15, 2017, 04:46 PM IST
अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर बेस्टच्या बसला आग title=

मुंबई : अंधेरी घाटकोपर लिंक रोडवर चकाला येथे दुपारी 2 च्या सुमारास बेस्टच्या बसला आग लागली. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्यानं बस थांबवली आणि प्रवाशांना बाहेर काढलं. तातडीनं अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. मात्र तोपर्यंत बसनं पूर्ण पेट घेतला होता.

बसच्या बाजुची एक कारही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी आग आटोक्यात आणली. घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.