मुंबई : महापौर बंगला हेरिटेज वास्तू असल्यामुळं बाळासाहेबांच्या स्मारकाच्या बांधकामाला निर्माण झालेला अडथळा दूर करण्यासाठी शिवसेनेनं नवा पर्याय शोधून काढलाय.
महापौर बंगल्याजवळील पार्क क्लबही ताब्यात घेणार आहेत. पार्क क्लब ही हेरिटेज वास्तू नसल्यामुळं बाळासाहेबांच्या स्मारकाचं बांधकाम करणं शक्य होणार आहे. तसंच या क्लबचा भाडेकरार 2001मध्येच संपल्यानं ही जागा हस्तांतरीत करणं सोपं जाणार आहे.
या क्लबच्या अखत्यारीत तब्बल 2704 चौरस मीटर एवढा भूखंड आहे. असं असलं तरी महापौर निवासस्थानही स्मारकाचाच भाग असेल. बाळासाहेबांचं स्मारक भव्य दिव्य करण्याचा शिवसेनेचा विचार आहे. त्यामुळं पार्क क्लबच्या जागेचाही उपयोग करण्यात येणार आहे.
पाहा नेमका कुठे आहे क्लब पार्क (व्हिडिओ)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.