राजीव गांधी जीवनदायी योजनेला बाळासाहेबांचं नाव द्या : आरोग्यमंत्री

राजीव गांधी जीवनदायी योजनेला बाळासाहेबांचं नाव द्या, अशी मागणी शिवसेनेचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. दरम्यान, या योजनेच्या नामांतराला काँग्रेसने विरोध केलाय.

Updated: Aug 6, 2015, 09:10 PM IST
राजीव गांधी जीवनदायी योजनेला बाळासाहेबांचं नाव द्या : आरोग्यमंत्री title=

मुंबई : राजीव गांधी जीवनदायी योजनेला बाळासाहेबांचं नाव द्या, अशी मागणी शिवसेनेचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. दरम्यान, या योजनेच्या नामांतराला काँग्रेसने विरोध केलाय.

राज्यात राबवल्या जाणाऱ्या जीवनदायी योजनेचं नाव बदलून त्याला बाळासाहेबांचं नाव देण्याची मागणी आरोग्यमंत्री सावंत यांनी केलीय. दीपक सावंत यांनी हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे पाठवलाय. या योजनेचं स्वरुपही बदलण्याची मागणी सावंत यांनी केलीय. 

या योजनेच्या नामांतरच्या मागणीवर राजकारण रंगण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसनं या मागणीला विरोध दर्शवलाय. त्यामुळं मुख्यमंत्री काय निर्णय़ घेतात याकडे लक्ष लागले आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील जनतेला, खासगी रुग्णालयामध्ये मोफत उपचार देण्यात येतात. सरकारनं ज्या खाजगी रुग्णालांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात, अशा रुग्णालयांमध्ये दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी 10 टक्के खाटा राखून ठेवण्यात येतात. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.