मुंबई : राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून, मिळणाऱ्या २१५४ कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीवर पाणी सोडावे लागले आहे. राज्य सरकारने या रकमेवर दावा न केल्याने केंद्र सरकारने ही रक्कम आपल्या राज्याला न देता इतर राज्यांकडे वळवली आहे.
एकीकडे राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यी शिष्यवृत्तीपासून वंचित असताना राज्य सरकारला यासाठीच मिळणारे २१५४ कोटी रुपये मिळू शकलेले नाही.
हा निधी मिळवण्यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने याचा कोणताच पाठपुरावा केला नाही. परिणामी राज्याला मिळणारा २१५४ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने दुसऱ्या राज्यांकडे वळवला आहे.