www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एप्रिल महिना संपत आलेला असताना हवेतला उकाडा वाढायला लागलाय. कालचा गुरूवार हा एप्रिल महिन्यातला सर्वाधिक हॉट डे ठरलाय. काल तपमानाचा पारा साडेछत्तीस अंशांवर पोहोचला. यापुढे तापमानात वाढच होईल, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय...
सांताक्रूझ वेधशाळेनुसार यंदाचं तापमान एप्रिल महिन्यातल्या सरासरीपेक्षा साडेतीन अंशांनी जास्त आहे. एप्रिलच्या पहिल्या तीन आठवड्यांमध्ये तापमान सरासरीच्या आसपास होतं. मात्र राजस्थान, गुजरातमध्ये झालेल्या पावसामुळे हवेतली आर्द्रता अचानक वाढल्यामुळे उकाडा असह्य होऊ लागलाय...