मुंबई : राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुरू असलेला व्यापा-यांचा संप अखेर मागे घेण्यात आलाय. मंत्रालात पणन मंत्र्यांसह व्यापारी, शेतकरी आणि माथाडी कामगारांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत सर्वसामान्य तोडगा काढण्यात आला.
फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा बाजार समित्यांमधून नियमनमुक्त करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. या निर्णयाला विरोध करत व्यापा-यांनी गेल्या पाच दिवसांपासून संप सुरू केला होता. त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारनं सर्व स्तरांमधील प्रतिनिधींनी बैठकीसाठी पाचारण केलं होतं.
एपीएमसीच्या संपामुळे भाजीपाल्यांचा दर मोठ्या प्रमाणात वाढला होता. ५ दिवसानंतर संप मागे घेतल्याने आता सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.